चारित्र्याच्या संशयावरून जन्मदात्या पित्याने स्वतःच्या मुला मुलीवर कुऱ्हाडीने वार करून केले दोघांना जखमी....

दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा आरमोरी (Gadchiroli) : चारीत्र्याच्या संशयावरून जन्मदात्या वडीलाने स्वतःचा मुलगा व मुलीवर कुर्‍हाडीने वार (Gadchiroli crime) करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर स्वतःसही जखमी केल्याची घटना काल २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास (Armori Police) आरमोरी तालुक्यातील देलाडा(बुज) येथे घडली. मुलगा रणजित सहारे(१९) ,मुलगी दीक्षा सहारे (२२) अशी जखमी भावंडांची नावे असुन नीलकंठ सहारे (४६) असे आरोपी वडीलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी नीलकंठ सहारे हा आपल्या मुलांवर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ही आपली मुले नाहीत असा संशय बाळगुन होता. तोच राग मनात ठेऊन मुलांच्या तोंडावर ,डोक्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने दोघेही भावंडे गंभीर जखमी (Gadchiroli crime) झाले. त्यांना उपचाराकरिता गडचरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस आरोपीच्या अटके संदर्भात पुढील तपास करीत असल्याची माहिती (Armori Police) आरमोरी पोलिसांनी दिली.

0/Post a Comment/Comments