माजी पालकमंत्री राजे अंब्रिषराव आत्राम यांच्या सहकार्याने पांदि पारी कुपाल लींगो क्लब धनुरटोला द्वारे आयोजित भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न....




गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
दिनेश बनकर
 मुख्य संपादक


*मुलचेरा* : तालुक्यातील धनूर टोला
येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने 'पांदी पारी कुपार लिंगो क्लब धनूर टोला' यांच्या सौजन्याने भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून श्री.खेवले सर मुख्यध्यापक राजे धर्मराव हायस्कूल लगाम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केल.

या कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आत्राम सर धनूर टोला तर प्रमुख पाहुणे म्हणून कु.भावनाताई कुसनाके पोलीस पाटील,नामदेव कुसनाके माजी सभापती पंचायत समिती मूलचेरा,तुकाराम शेडमाके,दीपक कुसनाके,किशोर सडमेक होते.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेला हाजरी लावली होती.

या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 15001-/रु माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून देण्यात आला तर द्वितीय पुरस्कार 10001-/ रु रोहिदास कुसनाके,आत्राम सर,अकोले साहेब यांच्या कडून तर तृतीय पुरस्कार 7001-/ रु मनोज बंडावार उपसरपंच यांच्या तर्फ देण्यात आला.

यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी धनूर टोला गावकरी, युवा वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.!☝️👇

0/Post a Comment/Comments