गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
_ब्रम्हपुरी_
_तालुक्यातील चिचगावं येथे खास दिपावलीच्या शुभपर्वावर लोकरंजन सांस्कृतिक मंडळ, चिचगावं यांच्या वतीने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ९.०० वाजता ग्रामपंचायत चिचगावंच्या भव्य आवारात डॉन्स कॉम्पीटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या डॉन्स कॉम्पीटेशन स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते पार पडले. या *स्पर्धेचे सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर*, कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरीचे संचालक किशोर राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन इंजि. अविनाश मस्के भुज, मंगेश अलोने बाबासाहेब चीचगावं, रिंकू सिंग उद्योगपती, कुलदीप सिंग उद्योगपती, किशोर बालपांडे रुई यांच्या हस्ते करण्यात आले._
_या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रोषनभाऊ नवघडे बांधकाम कंत्राटदार वांद्रा, उपाध्यक्ष म्हणून गुरुदेव वाघरे उपसरपंच वांद्रा, हेमंत सेलोकर गांगलवाडी, धनराज उरकुडे चिचगावं उपस्थित होते. प्रमूख अतिथी म्हणून गिरिधर ठाकरे उपसरपंच चिचगावं, विवेक बनकर सरपंच गांगलवाडी, जगदिश अलोने ग्रा.पं. सदस्य, निताताई राऊत ग्रा.पं. सदस्या, संजय उरकुडे रोजगार सेवक, गुलाब वसाके, पुंडलिक झोडे पोलीस पाटील, धीरज पाल वांद्रा, संतोष अलोने व प्रमूख पाहूणे म्हणून सुमित सेलोकर, रामदास वलके, पांडुरंग ठेंगरी, रमाकांत ठाकरे, चेतन ठाकरे, धीरज निमगडे, विलास राऊत, संजय वलोडे, समीर मैंद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._
_या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम बोलतांना प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणजे दिवाळी हा सण आहे. असे नृत्य स्पर्धेचे कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. गावातील कलाकारांना असे कार्यक्रम प्रोत्साहन देणारे असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणारे असतात. ग्रामीण भागामध्ये अशा नृत्य स्पर्धांचे आयोजन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये, कलाकारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे ठरतात. असे प्रतिपादन केले._
_लोकरंजन सांस्कृतिक मंडळ, चिचगावं यांच्या वतीने आयोजित डॉन्स कॉम्पीटेशन स्पर्धा ही दोन गटात आयोजित केलेली होती. स्पर्धेत पंचक्रोशीतील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. स्पर्धेनंतर लगेच बक्षीस वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रफुल राऊत, रमण राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले._
Post a Comment