गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
दिनेश बनकर
मुख्य संपादक
दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी मौजा चोरटी (वायगाव) ता. ब्रह्मपुरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत या सरकारने निर्माण केली अर्थव्यवस्था ही सर्वसामान्य जनतेला लुबाडून पुंजीपतींना धनाढ्य बनविणारी आहे. मोठ्या प्रमाणावर कर लादून व महागाई वाढवून पुंजी पतींचे घर भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेत मूठभर श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेले असून गरीब आणखी गरीब होत चाललेला आहे. ही विषमता मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे काम या सरकारने केलेले आहे. करिता निवडणुकीत मतदान करतांना विचारपूर्वक निर्णय घेऊन पुंजीपती धार्जिन्या सरकारला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद भाऊ चिमुरकर, सह उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य राजेशजी कांबळे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराजजी तिडके, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष सोनू भाऊ नाकाडे, माजी सरपंच राजेशजी पारधी, अमोलजी सुपारे, ॲड. समीर चौधरी, पोलीस पाटील सुनीताताई वलके, सरपंच राजूभाऊ राऊत, तुळशीरामजी कातलाम, दिनेशजी कातलाम, मुखरुजी रामटेके, सदानंदजी शेंडे, विश्वनाथजी ढोरे, रमेशजी बागडकर, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
Post a Comment