गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
दिनेश बनकर
मुख्य संपादक
मिळालेल्या माहितीनुसार
गडचिरोली
तालुक्यातील मरेगाव येथील युवकास रानटी हत्तीने हल्ला करून
चीरडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मरेगाव परिसरातील शेतातील धानपिक सध्याच्या घडीला कापणीला आले आहे आणि जिल्ह्यामध्ये धान्य कापनी व मळणी चे काम सध्याच्या घडीला जोरात सुरू आहे यामुळे शेतकरी वर्ग हा जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये राहत आहे आणि काही शेतकऱ्यांचे शेत जंगला लग असल्याने त्यांना शेतामध्ये शेतीचे कामे करण्याकरिता मोठया हिमतीने राहावे लागते मात्र जंगलामध्ये रानटी हत्तीचा प्रकोप आणि वास्तव्य वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आणि अशातच मरेगाव येथील एका युवकाला जंगली हत्तीने शिरडून ठार केले यामुळे परिसरात जंगली हत्तीचे मोठ्या प्रमाणात दहशत पसरल्याचे दिसून येत आहे चार ते पाच दिवसापासून मरेगाव परिसरात डार्लिं परिसरात हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्य पिकाचे नुकसान केले आहे मात्र वनविभागाचे या हत्तींना पिटाळून लावण्याकरीता ठोस उपाय योजना दिसत नसल्याने वन विभागाप्रती शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे वनविभागाने हत्तींना पिटाळून लावण्याकरिता ठोस उपाययोजना कराव्या आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान धान्य पिकाची नुकसान आणि जीवित हानी टाळावे असे परिसरातील शेतकरी तथा सामान्य वर्गातून बोलले जात आहे परिसरात वाघाची दहशती मध्ये सुद्धा सामान्य जनता वावरत आहे आणि वाघाच्या हल्ल्यात सुद्धा अनेक शेतकरी वर्गांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Post a Comment