शिष्यवृत्ती करिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्था कोजबी व जिल्हा परिषद शाळा कोजबी यांच्या वतीने केला गेला सत्कार सन्मान...

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमोरी ब्युरो




नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील जिल्हा परिषद शाळेतील सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसले होते यामध्ये शिष्यवृत्ती करिता पाच विद्यार्थी पात्र झाले आणि एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व बुद्धिमत्तेला प्रोत्साहन पर चालना मिळेल अशा उदांत हेतूने डॉक्टर बाबासाहेब


 आंबेडकर बहुउद्देशीय शहरी व ग्रामीण सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार दिनेश बनकर आणि जिल्हा परिषद शाळा कोजबी यांचे वतीने शिष्यवृत्ती करिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.





शिष्यवृत्ती साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रुची लिंगायत, अश्विन नागदेवते, संकेत बनकर, प्रीतम ताडाम, द्रोण दुमाणे , उत्कर्ष बरडे यांचा शाळेच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक शहरी व ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय केंद्रप्रमुख राजेश वडपल्लीवर,मुख्याध्यापक गोवर्धन शेंडे, पदवीधर शिक्षक प्रकाश चीलबुले, प्रशांत ठेंगरे, भरने मॅडम आदींना दिले.आहे.

0/Post a Comment/Comments