गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
कोरची ब्युरो
जीवनाची सुरुवात सुखी संसाराने व्हावी आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत आपल्या जीवनामध्ये नव अंकुर फुलावेत अशी स्वप्न बाळगून दोघे जणांनी जीवनाची रेशीम गाठ बांधली मात्र अवघ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाच्या पोटामध्ये वेदना सुरू झाल्या आणि नवरदेव नवरी सोबत उपचाराकरिता जात असताना नवरदेवाने आपले प्राण सोडले. कोरची तालुक्यातील गहाणे गोटा येथे 3 मे रोजी घटना सकाळी घडली नारायण कवल सिंह बोगा वय 36 वर्षे राहणार गहाणे गोटा असे मृतक नवरदेवाचे नाव आहे. मृतक नवरदेव हा शेती व मोलमजुरीचे काम करतो .अशाच त्याच्या वडिलांचे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मृत्यू झाले तेव्हापासून त्याची आई आणि नारायण दोघेच आपल्या घरी राहत होते. आलेल्या परिस्थितीत दोन हात करून दोघे मायलेक आपल्या परिवाराचा गाडा हाकत होते .मात्र मुलाचे लग्नाचे वय झाल्याने आईने लग्न करण्याचे ठरवले अशातच 3 एप्रिल रोजी छत्तीसगड राज्यातील मानपुर चौकी तालुक्यातील माधोपुर येथील फिरूराम कुमेटी यांच्या दिपीका या मुलीशी विवाह झाला .मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी नारायण ने गावी स्वागत समारंभ ठेवलेला होता .लग्नाच्या दिवशी नारायणच्या पोटामध्ये दुखत असल्याने त्याने ही गोष्ट जवळच्या लोकांना सांगितले होते. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी त्याने बेतकाटी येतील एका खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार केले होते .
2 मे रोजी परत पुन्हा त्याची प्रकृती खालावली आणि त्याच्या पोटामध्ये वेदना सुरू झाल्या त्यामुळे त्यांनी नववधू नवरी सोबत आणि आपल्या सोबत मित्राला घेऊन दुचाकीवरून तो वासळी गावाकडे दवाखान्यात जाण्यास निघाला परंतु अर्ध्या वाटेत गेला असता त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्याने वाटेत मोटरसायकल थांबवले आणि नववधूच्या मांडीवरच त्याने आपले डोके टेकवले असता त्याने काही वेळातच प्राण सोडले. आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर त्याच्या
दुचाकी वरचा हा नववधू सोबत पहिलाच प्रवास होता परंतु नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ असावा अखेर नारायण आपले प्राण सोडले आणि नववधूला जबर हादरा बसला नारायणचे प्राण गेल्याने त्याच्या घरी शोककळा पसरली. परिवारामध्ये खुशीचे क्षण असताना अचानक नारायणचे प्राण गेल्याने परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर पसरले .नारायणच्या जाण्याने परिवाराची मोठी हानी झाली आहे आणि गाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment