जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार, आरमोरी येथील प्रकरण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद..

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


*– जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार उघडकीस आल्याने  आरमोरीत खळबळ उडाली आहे .
दाखल झालेल्या गुन्हा नुसार आज दिनांक 02/05/2025 चे 18.43 वाजता आरोपी – मे जनता राईस मिल, आरमोरी, जिल्हा गडचिरोली चे प्रोप्रा. हैदर पंजवानी, वय अंदाचे 62 वर्ष , रा.आरमोरी, ता.आरमोरी जि.गडचिरोली यांना सन 2021- 2022 या वर्षात एकूण 9316.39 क्विंटल शासकीय धान घेऊन दिले.
त्या बदल्यात 6242.26 क्विंटल तांदूळ जमा करण्यात आला होता त्यापैकी एक लॉट 270 क्विंटल तांदूळ हा 405 क्विंटल धानापासून तयार केलेला त्याची बाजार मूल्य 1940/- रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे



 7,85,700/- रुपये किमतीचे तांदूळ हे बीआरएल म्हणजे मानवी खाण्यास अयोग्य आढळून आले आहे.
म्हणून फिर्यादी मनोज गणपत डहारे वय 40 वर्षे व्यवसाय नोकरी ( तहसीलदार तथा खरेदी अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय गडचिरोली ) याने मे जनता राईस मिल चे मालक आरोपी यांचे विरुद्ध जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मानवी खाण्यास योग्य असे तांदूळ देऊन शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली आहे, अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.




अ.क्र.155/2025 कलम 420 भा द वी सहकलम जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 10, काळाबाजार प्रतिबंध व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखणे अधिनियम 1980 चे कलम 3(1) ,
सदर गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments