गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली शहरातील अनेक दुकाने व आस्थापना यांच्या दर्शनी भागावर लावलेल्या पाट्या इतर भाषेमध्ये आहेत. यामुळे शहरात येणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, तसेच मराठी भाषेचा सन्मान राखणे प्रत्येक आस्थापनाधारकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली शहराच्या वतीने आग्रही मागणी आहे की, शहरातील सर्व दुकाने, बँका व आस्थापना यांनी त्यांच्या पाट्या मराठी भाषेत कराव्यात. मराठी ही आपली राजभाषा आहे आणि तिचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे.
या मागणीची तात्काळ दखल घेऊन, शहरातील सर्व शासकीय, खाजगी, व सहकारी बँक व्यवस्थापक, शाळा चालक,दुकानदार व आस्थापना चालकांना त्यांच्या पाट्या मराठीत करण्याची सूचना देण्यात यावी,
या संदर्भात योग्य कार्यवाही न झाल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल.अशे निवेदणाद्वारे कळविण्यात आले.
यावेळी,राजेंद्र साळवे (मनसे जिल्हा अध्यक्ष ) इंजि. अंकुश संतोषवार (मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष ) प्रशांत कस्तुरे, पवन कोसणकर हे उपस्थित होते...
Post a Comment