तालुका प्रतिनिधी
नागभिड
गारपीटीने नागभीड तालुक्यातील उन्हाळी धानाला जोरदार तडाखा, चिखलात मिसळले लोंब, अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल, उत्पादन घटण्याची धास्ती, अनेकांनी कर्ज काढून केली शेती नागभीड
_तालुक्या मध्ये दिनांक १ते ३मे रोजी वादळासह गारपीटीने झोडपल्याने तालुक्यामधील उन्हाळी धान पिकाला जोरदार तडाखा बसला आहे धानाचे लोंब चिखलात मिसळल्याने उत्पादन घटण्याची भिती
निर्माण झालेली आहे तालुक्या मधील अनेक गावामधे बोरवेल व विहीरी यांच्या पाण्यामुळे सिंचनाची सुविधा असल्याने उन्हाळी धान पिकाचे लागवड क्षेत्र वाढले आहे उन्हाळी धान पिकाला रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो त्यामुळे उत्पणात वाढ होत असतो यासाठी शेतकरी धान रोवनीला पसंती देत आहेत तालुक्यामध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तिनही दिवशी
गारपीटीसह वादळी वारा व पावसाने धान पिकाला चांगलेच झोडपले आहे काही शेतकरी यांनी धान कापनी सुरु केली आहे तर काही शेतकरी यांचे धान कापनीवर आले आहे अश्या अवस्थेत अवकाळी
वादळी पावसाचा व गारपिटीचा तडाखा बसल्याने धान पिकाचे खुप मोठी हानी झाली आहे उत्पणात घट निर्माण होण्याचे चित्र दिसत असल्याची माहिती तालुक्यातील शेतकरी यांनी दिली आहे अनेक शेतकरी यांनी उन्हाळी शेती करण्यासाठी ब्याकेकडून व सावकाराकडून कर्ज काढले असल्यामुळे नुकसानीने पुर्णपणे धास्तावले आहेत तसेच अनेक घरांचे व झाडांचे खूप मोठय़ा प्रमाणात नुकसान झाली आहे करीता शासनानी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करून आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवानी केली आहे
Post a Comment