गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
मुरूम काढण्यासाठी बारा तासाचा परवाना असताना 24 तास माती, मुरूम उत्खननाची परवानगी दिली आहे का ? जनतेच्या तोंडून उपस्थित होत आहेत प्रश्न..
विदर्भ केसरी, गडचिरोली : वडसा तें गडचिरोली नवीन रेल्वे लाइनचे
काम मागील वर्षा पासून चालू आहे तें काम आता चुरमुरा तें पोर्ला च्या हद्दीत चालू आहे रेल्वे कामाकरिता चुरमुरा व पोर्ला शिवारातील लहान मोट्या तलाव बोड्यांचे ग्रामपंचायतचे संमतीने माती मुरूम काढण्या करीता परवानगी काढण्यात आलेली आहे. परंतु कोणतेही उतखणन करण्या करीता सकाळी 6 तें सायंकाळी 6 वाजता पर्यंत परवानगी दिली जाते. मग रेल्वे कामाकरिता 24 तास दिवस रात्र मुरूम माती उतखणन करण्याची परवानगी देण्यात आली आहे का? चुरमुरा तें पोर्ला क्षेत्रामध्ये दिवस रात्र मुरूम माती उतखणन रेल्वे कामाकरिता केल्या जात आहे. मग महसूल खात्याचे कर्मचारी व अधिकारी हातावर हात देऊन गप्प कसकाय बसले आहेत याच्या वरून असे लक्षात येते कि महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने हे उतखणन चालू आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावे असे सुद्धा सामान्य जनतेमधून बोलले जाऊ लागले आहे.
Post a Comment