गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
*कुरखेडा: -* अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल एक सामान्य गृहिणी व शेतकरी महिला असून इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असताना त्या बालवयापासून किराणा दुकानातील रद्दी वृतपत्र वाचून साहित्य लिखाणाला सुरूवात केली आणि आजपर्यंत त्यांनी ५० पुस्तकांचे समीक्षा केले आहेत तसेच एकूण ६० वृतपत्रात,अनेक पुरवणीत,संपादकीय पानावर, ज्वलंत विषयावर लेख लिहिले आहेत. सोबतच सामाजिक लेखन,कविता लिहिले आहेत. अनेक दिवाळी अंकात तसेच काही मासिकात त्यांचे लिखाण प्रकाशित झालेले आहेत आणि काही पुस्तकांना शुभेच्छापत्र, प्रस्तावना सुद्धा लिहून दिले आहेत.
सोबतच त्यांचे दैनंदिन लिखाण अखंडीतपणे सुरू आहे. संगीता ठलाल या एवढ्या पुरते न थांबता लिहिलेल्या साहित्याप्रमाणेच त्यांनी नि:स्वार्थ भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांची सन्मानपूर्वक उपस्थिती दिसत असते. त्याच प्रमाणे त्यांचा दैनंदिन सकाळ सदर सुरु असलेला विचारधारा सुविचार सदर अत्यंत लोकप्रिय झालेला असून वाचक वर्ग बहुसंख्येने वाढले आहेत. हेच त्यांचे समाजासाठी भरीव असलेले मोलाचे योगदान आणि कार्य बघून रेडीओ आकाशवाणी केंद्र नागपूर यांनी सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांची साहित्यसेवा व सामाजिक कार्याची दखल घेतली आहे . रेडीओ आकाशवाणी केंद्रातील कर्मचारी रोहिणी
सूर्यवंशी यांनी १५ एप्रिल रोजी संगीता ठलाल त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचे प्रसारण मंगळवार दि.६ मे ला, सकाळी १०.३५ मिनिटांनी "माझे सामाजिक कार्य आणि लेखन" या कार्यक्रमात होणार आहे. रेडीओ आकाशवाणी केंद्र नागपूर यांनी साहित्य सेवा तसेच सामाजिक कार्याची दखल घेतल्या बद्दल संगीता ठलाल यांनी रेडीओ आकाशवाणी केंद्राचे आभार मानले. तसेच होणाऱ्या या मुलाखती बद्दल सर्वच स्तराहून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment