बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
नागभीड _तालुक्यामधील तळोधी बा वनपरीक्षेत्रातील गोविंदपुर बिटातील चारगाव चक येथे गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे एवढेच नाही तर अनेक पाळीव प्राण्याला बिबट्याने आपले भक्ष बनवीले आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत चारगाव चक येथील परसराम येसनसुरे यांच्या गायीचा गोरा गणपत वाघाडे यांचा कुत्रा वाल्मीक कराडे यांचा कोंबडा तर शनिवारी गावाशेजारी असलेल्या मेंढपाळ यांच्या मेंढीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले याबाबत वनविभागाला वारंवार कळविण्यात आले मात्र अद्यापही बिबटयाच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने पावले उचलण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात रोष व्यक्त होत आहे नागभीड तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष नवा नाही सध्या चारगाव चक येथे सुरु असलेल्या बिबटयाच्या सततच्या हलयामुळे मानव वन्यजीव संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनविभागाने वेळीच उपाययोजना करने गरजेचे आहे व नुकसान ग्रस्थ नागरिक यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
Post a Comment