गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त हमीभाव न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो असे राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे यांनी अध्यक्षीय स्थानावरून विचार व्यक्त केले. शेतकऱ्याच्या शेतमाल हमीभावासाठी विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांना घेराव घाला आंदोलनाच्या तयारी अंतर्गत शेतकरी परिषद लुंबिनी बुद्ध विहार पारडी (कुपी) येथे घेण्यात आली. या परिषदेचे उदघाटक प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष आरपीआय होते . विशेष अतिथी चंद्रशेखर पाटील जक्कनवार
शेतकरी कार्यकर्त , बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव प्रमोद राऊत , घनश्याम मुरवतकर उपसरपंच पारडी , जयंत गेडाम जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, संगम बांबोळे बुद्ध विहार समिती अध्यक्ष , खेमदेव हस्ते , उद्धवराव बौद्ध होते.
दिपक इंगळे राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की , पिक विना कंपन्या हजारो कोटीचा फायदा शेतकऱ्यांपासून मिळवून घेतात . शेत विज बिलांचे हजारों कोटींचे घोटाळे करतात परंतू आमचे खासदार आमदार संसदेत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत नाही. कार्यक्रमाचे उद्घाटक मुनिश्वर बोरकर आरपीआय
जिल्हाध्यक्ष म्हणाले की ,शेतकऱ्यांची लुटमार करून शेतकऱ्यांना गुलाम करण्याचे षडयंत्र दिवसोंदिवस केले जात आहे . या प्रसगी चंद्रशेखर पाटील जक्कनवार ,भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष यांनीसुद्धा मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला भोजराज कोलते , तुषार रामटेके , राकेश भनारे , छत्रपती इंगळे , हंसदास अलोने , चंद्रशेखर मुरतेली , योगेश वासनिक ' राकेश जांभुळकर तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संचालन लोमेश रामटेके यांनी केले तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले .
Post a Comment