सुप्रसिद्ध गायिका अंजली भारतीने गडचिरोलीकरांची मने जिंकली.. कार्यक्रमाला भरगच्च अशी गर्दी...


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
संपादक मुनिश्वर 
बोरकर



 गडचिरोली . गडचिरोली - सुप्रशिद्ध गायक - कव्वाल अजंली दिदि भारती मुंबई ह्यांचा संविधान प्रबोधन भिमगिताचा सदाबहार कार्यक्रम दि. १० फरवरीला संविधान चौक गडचिरोली येथे पार पडला. आपल्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात अजंली भारती म्हणाल्या की संविधान कर्ता आमचा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. संविधान बदलविणाऱ्यांनी संविधान लिहणारा आपला दुसरा बाप तयार करावा व संविधान बदलवावा त्यांचे तगडे



 तोडल्याशिवाय राहणार नाही. बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धाचे आहे. तेव्हा बुद्धगया बौद्धांच्या स्वाधीन करावे असेही अंजली दिदीने सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक कांग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या ॲड . कविता माहोरकर तर दिपप्रज्वलन रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगरसेवक शतिश विधाते ,



 माजी प .स सदस्य तथा प्राचार्य हेमंत रामटेके , राकेश रत्नावार , ॲङ विनय बांबोळे , उमेशभाऊ वासाडे आदि लाभले होते. कार्यक्रमाचे आयोजक कॉन्ट्राक्टर संदिप बेलखेडे , सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ वडेट्टिवार हे होते. कार्यक्रमाचे संचलन नाटककार शिद्धार्थ गोवर्धन यांनी केले तर आभार प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी मानले. कार्यक्रमात संविधान चौक मित्र मंडळ गडचिरोली च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सहकार्य केले.
पोलीसांची दुप्पटी भुमिका - अंजली भारतीच्या कार्यक्रमाचा वेळ पोलिसांनी रात्रौ १० वाजता ठरविला कार्यक्रम ८.30 ला सुरु झाला गडचिरोली पोलीसांनी १०. १० ला कार्यक्रम बंद पाडला. आणि तमाम् बौद्ध बांधवाची नाराजी झाली अवघ्या दिड तासातच कार्यक्रम गुंडाळावा लागला. मात्र मागील महिन्यात कॉमेक्स येथील सुप्रशिद्ध गायक सोनु निगम मुंबई यांचा कार्यक्रम रात्रौ १२ वाजेपर्यंत सुरुच होता. असे का ? नाटक , दंडारीला संपूर्ण रात्रौ मात्र अंजली


 भारतीच्या कार्यक्रमाला लगाम याचा विचार गडचिरोली पोलीसांनी करावा. अशा दुजाभाव नको. आयोजकांनी रात्रौ ११ पर्यंत फक्त पुढे एक तास घ्या अशी विनंती पोलीसांना करूनही पोलीस ऐकले नाही. अशी पोलीसांच्या दुट्टपी भुमीकेचा आर पिआय तर्फे निषेध नोंदविण्यात आला . कार्यक्रमास तोबा गर्दी जमली होती.

0/Post a Comment/Comments