गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर.
देसाईगंज -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी/दीक्षाभूमी देसाईगंज येथे क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब भिमरावजी रामजी आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती पर्वाच्या निमित्ताने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २९ एप्रिल १९५४ बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.वाजता प्रेरणा"मी योध्दा भिमा कोरेगावचा या नाटकाचा प्रयोग दाखविण्यात आला .
उद्घाटन पर कार्यक्रमात अध्यक्ष खासदार डॉ. नामदेवजी किरसान आमदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र यांनी देशात संविधानाच्या पायमल्ली चे होणारे भिषण परिणाम वास्तव यावर भाष्य केले. उद्घाटक आमदार रामदास मसराम साहेब यांनी शिक्षणा सोबत संस्कार अंगी असणे आवश्यक आहे असे म्हटले. सह उद्घाटक कृष्णाजी गजबे माजी आमदार आरमोरी क्षेत्र यांनी दीक्षाभूमीला सर्वतोपरी मदत करीत
राहण्याचे आश्वासन दिले. विषेश अतिथी म्हणून समितीचे सल्लागार मारोती जांभूळकर सर,चंदुराव राऊत, जेसाभाऊ मोटवाणी,प्रकाश बारसागडे सर, गौतम मेश्राम सर, विस्तार अधिकारी अमित केरामी, राजेंद्र बुल्ले,सागर वाढई,दिवाकर शेंडे सर, पत्रकार अरविंद घूटके,पत्रकार राजरत्न मेश्राम,पत्रकार किशोर मेश्राम,पुरूषोत्तम बडोले हे होते. प्रास्ताविक समिती च्या सचिव ममता जांभूळकर संचालन अश्विनी माने तर आभार जयश्री लांजेवार यांनी केले. १४ एप्रिल ला सकाळी १०.वाजता निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण बोरकर सर नंदागवळी सर व समिती च्या अध्यक्षा कविता मेश्राम, यांच्या हस्ते झाले. संध्याकाळच्या सत्रात अध्यक्ष प्रा. डॉ. अमित रामटेके सर व उद्घाटक प्राचार्य दामोदर सिंगाडे यांच्या उपस्थितीत हरिश्चंद्र लाडे संच संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.प्रमुख अतिथी म्हणून विष्णू नागमोती, लोकमान्य बरडे,बंडूभाऊ सिडाम,प्रविण मूझूमदार, दुधराम शेंडे सर यांनी उपस्थिती लावली.प्रास्ताविक सरीता बारसागडे, संचालन रश्मी गेडाम तर आभार पौर्णिमा बोरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय मेश्राम, डांगे सर, मोरध्वज शिंपोलकर, रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम, प्रतिभा बडोले, प्रतिमा शेंडे, मंदा शिंपोलकर, लीना पाटील,ममता रामटेके, सुनिता नंदागवळी आशा रामटेके, दुर्गा रंगारी कल्पना गोवर्धन, श्रूतकिर्ती लाटकर करुणा मेश्राम ,प्रेरणा बोरकर यांनी विशेष सहकार्य केले तर भोजन दान वाटपात नरेश वासनिक व योगेश नांदगाये परिवाराने सहकार्य केले.
Post a Comment