पदस्पर्धभूमी (दीक्षाभूमी) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन, आमदार राजकुमार बडोले यांची उपस्थिती...

 गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली. देसाईगंज - सम्यक जागृत बौद्ध महिला समिती देसाईगंज च्या वतीने पद्स्पर्शभूमी दिक्षाभूमी वडसा येथे दि. १३व १४ एप्रिल २०२५ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि. १३एप्रिल ला ' मी योद्धा भिमा कोरेगांवचा ' या नाटकाचा प्रयोग सांयकाळी ७ वाजता होणार असुन सदर नाटकाचे उदघाटक खासदार नामदेव किरसान तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले , आमदार रामदास मसराम माजी आमदार कृष्णा गजबे आदि राहणार असुन विशेष अतिथी म्हणुन उपविभागीय अधिकारी मानसी मॅडम ' तहसिलदार डुडुलकर मॅडम ' बिडिओ खोबरे मॅडम , न.प चे मुख्याधिकारी कुलभुषण रामटेके प्राचार्य देवेश कांबळे ब्रम्हपुरी , जेसा मोटवानी , अशोक रामटेके ब्रम्हपुरी ' डॉ. प्रेमलाल मेश्राम ब्रम्हपुरी ,किसन नागदेवे वडसा ,'रोहिदास राऊत , प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली , ॲड देवानंद गुरु , बौद्धकुमार लोणारे सामाजिक कार्यकर्ता मारोती जांभुळकर वडसा , यशवंत जांभुळकर आरमोरी , हरिदास इंदुरकर , अशोक इंदुरकर आदि लाभणार आहेत.
दि. १४ एपिल २०२५ सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचा कार्यक्रम ध्वजारोहन व मार्गदर्शन रात्रौ ८ वाजता लार्ड बुद्धा ग्रुप चा संगितमय धम्म प्रबोधन कार्यक्रम अध्यक्ष डॉ. अमित रामटेके कुरखेडा , उदघाटक संजय गणविर साहेब , प्राचार्य दामोधर सिंगाडे वडसा आदि लाभणार आहेत .


तरी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता मेश्राम सचिव ममता जांभुळकर ' उपाध्यक्ष शामला राऊत यांनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments