जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथे निरोप समारंभ संपन्न, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दिल्या शुभेच्छा....

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
आरमोरी 





 दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे उत्साही निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


सदर निरोप समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री गुलाबजी जुमनाके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रलयजी चहांदे उपसरपच कोसबी, श्री विनोदजी मानकर माजी सरपंच ग्रामपंचायत कोसबी, श्री दिनेशजी बनकर माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कोसबी श्री रोहिदास सहारे, श्री.गुलाबजी ताडाम,अनिता लिंगायत, संदीप बोदेले, पुण्यशीला धोटे, प्रकाश चीलबुले सर , भरणे







 मॅडम, अमित मेश्राम सर, प्रवीण सहारे सर, चेतन शेंडे सर आदी उपस्थित होते.
*सदर समारंभात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला ज्यामध्ये त्यांनी आपल्या शाळेतील अनुभव आणि आठवणी कथन केल्या*.
*शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले*.
*या निरोप समारंभात शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आनंदित आणि भावनिक क्षण अनुभवले


सदर समारंभाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री गोवर्धन शेंडे सर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री प्रशांत ठेंगरे यांनी केले.

0/Post a Comment/Comments