गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
गडचिरोली- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक घोट तालुका चामोर्शी येथे दिनांक १४ एप्रिल २०२५ सकाळी ९ वाजता साजरी करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच्या रुपालीताई दुधबावरे , प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विनय बारसागडे , ग्रा.प. सदस्य करणभाऊ गण्यारपवार घोट तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. राजन गजभिये नवोदय विदयालय घोट , प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली , गोपाल रायपूरे चंद्रपूर , RFO इटकेलवार घोट , डॉ. मेश्राम रेगडी , उपप्राचार्य इंदुरकर घोट , डॉ. हजारे , RFO वाडीघरे घोट , अल्का मुजुमकर , मुख्याध्यापिका विजयाश्री कांबळे , निलकंठ मेश्राम आदि लाभणार आहेत .
तरी होवू घातलेल्या कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विशाल दहिवले सचिव प्रदिप वाकडे यांनी केलेले आहे.
Post a Comment