ठेकेदारांच्या बांधकामाचे निधी अडकली कंत्राटदाराचे धरणे आंदोलन सुरू....

 
गडचिरोली सुपर फास्ट 
न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर
संपादक गडचिरोली 



 गडचिरोली - जिल्हयाचा विकास व्हावा म्हणुन शासनाने ठेकेदारांना दिलेले कामे आपल्या पदरच्या पैसाने , उसनवारी घेऊन कंत्राटदारांनी कामे पुर्ण केलीत परंतु एका वर्षापासून ७०० कोटीचे प्रलंबित देयके शासनाकडे अडकली आहेत यापूर्वी शासनाला वारंवार निवेदन देऊनही शासन या बाबीचा गार्भियाने विचार करतांना दिसत नाहीत . शासनाकडून निधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ठेकेदारांवर




 उपासमारीचे शंकट ओडवली आहे. गडचिरोली जिल्हा कंत्राटदार असोसिएशन गडचिरोली यांच्या वतीने अधिक्षक अभियंता गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर दि. १८ मार्च पासुन धरणे आंदोलनाला सुरवात झालेली आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामाचा निधी (अनुदान ) शासनाने तात्काळ अदा करावा अश्या मागण्यासाठी गडचिरोली जिल्हा कंत्राटदार असोसिएशन गडचिरोली च्या सर्व पदाधिकारी व कंत्राटदार उपोषणाला बसले आहेत.

0/Post a Comment/Comments