गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक मुनिश्वर बोरकर----
गडचिरोली
जगभरातील बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेले बिहार राज्यातील गया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भिक्ष संघाने सुरू केलेला लढा हा बौद्धांच्या अस्मिता व अस्तित्वाशी निगडित असा असून धार्मिक दृष्ट्या या लढ्याला बळ देणे आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.त्यामुळे आंदोलनात्मक दृष्ट्या भिक्षु संघांचा आदेश एक प्रमाण मानून आंबेडकरी अनुयायांनी या लढ्यात एक संघीयपणे सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन आंदोलनातील ज्येष्ठ नेते तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी भीमटेकडी कौंडण्यपूर येथे 20 मार्च 2025 गुरुवार रोजी आयोजित धम्म लढा चेतना अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी बोलताना केले आहे.
महाड सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून 20 मार्च रोजी दुपारी 1 वाजता तीवसा तालुक्यातील पवित्र स्थळ असलेल्या भीम टेकडी बुद्ध विहार कौंडण्यपूर येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ शुभारंभ करण्यात आलेल्या *धम्म लढा चेतना* अभियानाचे उद्घाटन भंते प्रियदर्शी नेर यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वप्रथम तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून धम्म वंदना घेण्यात आली
त्यानंतर अभियान प्रमुख चरणदास इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या अभियान शुभारंभ प्रसंगी भंते चंद्रमणी ,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा.डी .के.वासनिक, जिल्हा प्रभारी इंजिनिअर चंद्रकांत गुल्हाने, वर्धा जिल्हाध्यक्ष मेघराज डोंगरे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डी .जे .खडसे गुरुजी प्रा.पंकज वाघमारे, बाळासाहेब इंगोले लक्ष्मणराव वाघमारे सुरेश बहादुरे सामाजिक कार्यकर्त्या मृदुलाताई हेरोडे यांनीही मार्गदर्शन करून चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वातील धम्म लढा चेतना अभियानाच्या माध्यमातून महाबोधी महाविहार आंदोलनाला बळ प्राप्त होऊन जिल्ह्यात आंदोलनाचा वनवा पेटेल असे सांगून अभियानास शुभेच्छा दिल्या.
या अभियानाप्रसंगी महाबोधी विहार मुक्ती लढ्याच्या अनुषंगाने धम्म लढा चेतना अभियानाचा उद्देश विषद करताना अभियानाचे प्रणेते चरणदास इंगोले पुढे म्हणाले की, भिक्षु संघाने सुरू केलेल्या या मुक्ती लढ्याला धार्मिक ,सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या व्यापक बळ प्राप्त होऊन हा लढा अधिकाधिक व्यापक व्हावा यासाठी हे अभियान राबविणार असल्याचे सांगून या धार्मिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त अशा या अभियानांतर्गत 20 मार्च ते 12मे बुद्ध जयंती पर्यंत 200 पेक्षा जास्त बुद्ध विहारांना भेटी देण्याचा संकल्प करून धम्म लढ्याचा प्रचार व प्रसार केल्या जाईल.आणि त्याचप्रमाणे 2568 व्या बुद्ध जयंतीचे औचित्य साधून देशाचे महामहीम राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांचे महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात लक्ष वेधण्यासाठी 2568 निवेदन सादर करण्याचा प्रयत्न देखील केल्या जाणार असल्याचे चरणदास इंगोले यांनी या अभियानाचा उद्देश विषद करताना सांगितले आहे.
या शुभारंभ ला भंते प्रियदर्शी व भंते चंद्रमणी यांनी मार्गदर्शन करून अभियानाला आशीर्वाद दिले.
यावेळी बाळासाहेब इंगोले जिल्हा संघटक लक्ष्मण वाघमारे ,वाल्मिक डोंगरे, तिवसा तालुका अध्यक्ष प्रमोद मोरे, ओमप्रकाश पाटील ,तुलसीदास मेश्राम,
गोवर्धन नाईक ,साहेबराव वानखडे, सुरेश बहादुरे , सुनील इंगोले, समाजसेवक धनंजय मोहोड, दादाराव इंगळे, अरविंद सोनोने, रमेश वासनिक, मारोतराव फाटके, बबन मोहोड, सम्यक मून , भीमराव मोहोळ राहुल बोबडे ,शंकर तीखाडे , मनोज हरणे,
युवा जिल्हा उपाध्यक्ष रोशन मोहोड
, भीमराव धनकर, राजेंद्र मात्रे ,किशोर फाटके, प्रमोद देवरे, बाबाराव राऊत, मंगेश कलाने, मृदुलाताई हेरोडे ,वैशाली खोब्रागडे, दुर्गा खंडारे, जया गहूकार, नंदा खडसे ,वर्षा खडसे, सुमित्रा कठाणे, दिपाली फाटके ,निकिता वावरे, चंद्रसेन रंगारी, जानराव वाटाणे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पपीता मनोहरे यांनी तर आभार प्रदर्शन बंडूभाऊ ढोणे यांनी केले.
Post a Comment