डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शर्किट हाऊस समोरील थोर पुरुषांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रध्वज फडकवा, दिव्यांग मुकुंदराव उंदीरवाडे यांची मागणी...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
संपादक
 मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली -
शर्किट हाऊस कॉम्प्लेक्स समोरील गार्डन मधील नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा या थोर पुरुषाच्या पुतळ्यासमोर १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्य राष्ट्ध्वज फडकवून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून राष्ट्रगिताने जयंती साजरी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा गडचिरोली मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व



 राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन जिल्हा उपपोलीस निरिक्षक चव्हाण यांना निवेदन देतांना दिव्यांग मुकुंदराव उंदिरवाडे , सूधा चौधरी , भोजराज कानेकर , दामोधर शेंन्डे , मोरेश्वर सिडाम , विस्तारी फेबुलवार , रमेश डोंगरे , रोहिदास रामटेके , अर्चना रामटेके आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments