गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
चिमूर ब्युरो
कोलारी (साठगांव) ता. चिमूर जि. चंद्रपूर येथील दोन सख्ख्या भावांसह पाच तरुणांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे चिमूर तालुक्यातील कोलारी (साठगांव) गावावर शोककळा पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दुःखी परिवारातील सदस्यांची सांत्वनापर भेट घेउन या दुर्घटनेत जीव गमावणाऱ्या यश गावंडे, अमित गावंडे, जनक गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय पाटील गावंडे, प्रज्वलाताई गावंडे, जोगेंद्रजी कडू, गजभियेजी कानपा कोलारी येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Post a Comment