वृद्ध कलावंताचे सहा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या मानधन तातडीने देण्यात यावे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांची राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनातून मागणी....


गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
दिनेश रामाजी बनकर 
 मुख्य संपादक 
गडचिरोली 


आरमोरी - कलेच्या संवर्धनासाठी उभे आयुष्य खर्च करणार्‍या कलाकारांना वृद्धापकाळात थोडी मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यांना मानधन देण्याची योजना जाहीर केली. समाजातील दुर्बल, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना वृद्ध कलावंतांसाठी राबवली जाते. त्यातुन वृद्ध कलावंतांना वृध्दपकाळात मदत होतो परंतु हा अनुदान शासनाकडे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याने वृद्ध कलावंतांना आपल्या तबेतीसाठी औषधे जिवनात्मक वस्तू घेण्यास मोठी आर्थिक अडचणी जात असल्यामुळे
वृद्ध कलावंतांचे सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तातडीने देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांच्या कडे निवेदनातून केली आहे.

कलेच्या संवर्धनासाठी उभे आयुष्य खर्च करणार्‍या कलाकारांना वृद्धापकाळात थोडी मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यांना मानधन देण्याची बरेच वर्षापासून सुरू करण्यात आली आहे पण महिन्याच्या महिन्याला मानधन वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे वृद्ध कलावंतांना आथिर्क अडचणीचा सामना करावा लागतो यात आरोग्य उपचार औषधी जिवनाश्वक वस्तू पैसे अभावी घेणे शक्य नाही त्यातच आता गेल्या सहा महिन्यांपासून वृद्ध कलावत अनुदान शासनाकडे प्रलंबित असल्याने मोठी आर्थिक अडचन निर्माण



 झालेची समस्या वृद्ध कलावंतांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या निदर्शनास आणून देताच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांच्या कडे वृद्ध कलावंताचे हसा महिन्यांपासून प्रलंबित असलेलें मानधन तातडीने देण्यांत यावे अशी मागणी केली आहे.
यावेळी भेनेश्वर अबादे कातीक मातेरे अशोक भोयर शाहिर नरेंद्र गोधोळे श्रीपत वरखडे खोब्रागडे आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments