गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
संपादक
मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील बेलगांव मोहटोला रस्त्याच्या काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केलेली आहे. बेलगांव ते रांगी रोड टॅच मोहटोला रस्त्यांचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वतीने एका ठेकेदारा मार्फत सुरू असुन सदर कामाच्या रस्त्यावर मोठी बोल्डर गिट्टी थातुर मातुर पसरवून त्यावर अवैध मुरुमाचा थर
टाकण्यात आलेला आहे. सदर रस्ता रोडटॅच वरून अगदी खोलवर असुन पावसाचे पाणी वाहत गेल्यावर सदर रस्ता एका पावसातच वाहुन जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अगदी पांदन रस्ता बनविल्यागत ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरु आहे . संबंधित रस्ता बाधंकामाकडे संबंधित विभागाने लक्ष घ्यावे अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.
Post a Comment