गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
बाळकृष्ण उंबरकर
तालुका प्रतिनिधी
नागभीड
नागभीड तालुक्यामधील घरकुलांची कामे अडू नयेत म्हणून पंचायत समितीने तहसील कार्यालयाकडे ४३२ घरकुलांसाठी एक हजार ५९० ब्रास रेतीची मागणी केल्याची आणि तहसील कार्यालय यांनीही हा परसताव उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविला असल्याची विशवासनिय माहिती मिळाली आहे आता रेती केव्हा उपलब्ध होते याकडे घरकुल लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. घरकुल मिळाले पण रेतीचे काय असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यासमोर उभा ठाकला आहे रेतीच्या टंचाई मुळे अनेक लाभार्थी यांनी घरकुलाचे बांधकाम सुरु केले नाही घरकुल लाभार्थी यांची ही समस्या लक्षात घेऊन नागभीड पंचायत समितीने तहसील कार्यालय यांचेकडे १ हजार ५९० ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती आहे .प्रशासन केव्हा देणार रेती या पाार्शवभूूमीवर लाभार्थी यांची निकड लक्षात घेऊन पंचायत समितीने तहसील कार्यालय कडे घरकुल लाभार्थी यांना काही प्रमाणात रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र पुरस्कृत १२९ घरकुलांसाठी ४९१ ब्रास तर राज्य पुरस्कृत ३०३ घरकुलांसाठी १ हजार ९९ ब्रास रेतीची मागणी केली आहे आता प्रशासन घरकुल लाभार्थी यांना रेती केव्हा उपलब्ध करून देते याकडे घरकुल लाभार्थी यांचे लक्ष लागलेले आहे .
Post a Comment