महाराष्ट्र विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा पडला पार, स्नेह मिलन सोहळ्याची धुरा हवालदार रवींद्र मानकर यांनी पार पाडली ,स्नेह मिलन सोहळ्यात विद्यालयातील माजी शिक्षक तथा विद्यार्थी पाल्य यांचे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी यांचा केला गेला सत्कार ,महिलांना साडीचोळी प्रधान करून केला गेला सन्मान..

गडचिरोली सुपर फास्ट
न्युज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर
मुख्य संपादक
आरमोरी/ वैरागड




वैरागड : ज्या विद्यालयात आपण घडलो, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र मिळाले, त्या विद्यालयातील १० वी बॅचचे पुन्हा एकदा तेच विद्यार्थी मित्र-मैत्रिणी सोबत पुन्हा ३४ वर्षानंतर वैरागड येथील महाराष्ट्र विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळयात एकमेकांना भेटून शालेय जीवनापासून ते आजतागायत एकमेकांचे सुखदुःख व जीवन जगत असताना येणाऱ्या समस्या यावर विचारमंथन करून समस्या जाणून घेतल्या .
वैरागड येथील महाराष्ट्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सन १९९०-
९१ तुकडीतील १० वीत्याच बॅचचे मित्र-मैत्रिणींचा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले रविन्द्र मानकर यांनी व्हाट्स अॅप ग्रुप तयार करून एकमेकांशी संपर्क केला होता. अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील आठवणींना उजाळा द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्र-मैत्रिणींनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच ठिकाणी भेटण्याची योजना आखून वैरागड येथील
महाराष्ट्र विद्यालयात दि.
१९ जानेवारी रोजी संध्याकाळी स्नेहमिलन सोहळा
आयोजित
करण्यात आला. हळूहळू सर्व मित्र मैत्रिणी एकत्र गोळा झाल्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. महाराष्ट्र विद्यालयातील ५० हुन अधिक विद्यार्थी, माजी वर्ग मित्र इतक्या वर्षाने एकत्रित पहिल्या भेटीत शाळेतील ते चेहरे आठवित होते. हळुहळु सर्वांनी एकमेकांशी मनमुराद गप्पा करून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवाराविषयी, कामकाजाविषयी व सध्या आपल्या आयुष्यात काय चालल आहे एकमेकांच्या परिवाराची इतंभुत माहिती
एकमेकांना सांगतांना गप्पा रंगत गेल्या.



१९९०-९१ च्या बॅचचे विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणीकडे बघितले तर ३४ वर्षानंतर ते चेहरे दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वैरागड येथिल स्नेहमिलन सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे बालपण आठवण करीत शाळेतील गमतीशीर टिंगलटवाळी करीत, हसत-मुखत, गाणी गात, आनंदी प्रसन्नतेच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. या स्नेहमिलन सोहळ्यात ३४ वर्षापूर्वीचे महाराष्ट्र विद्यालयातील विविध ठिकाणी राहणारे विद्यार्थी एकत्र आल्याने एकमेका प्रती प्रेमभावना दृढ झाल्याचे दिसत होते .
स्नेह मिलन सोहळ्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत
व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना काही शाळेतील माजी विद्यार्थी जुन्या आठवणीना उजाळा देत आपल्या मनातील जुन्या मैत्रीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती .



स्नेह मिलन सोहळ्याच्या निमित्ताने शाळेतील काही माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे पाल्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
प्रेरणा चोखाजी भैसारे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय जळगाव एम.बी.बी.एस.
कुमारी भारती रवींद्र मानकर सिव्हिल इंजिनिअर कुमारी अनूमा पुरुषोत्तम लाडे सहकार विभाग कुमारी जानवी गुलाब मेश्राम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी शर्वरी बाळू टेंभुर्णे महावाचन स्पर्धेत द्वितीय आल्याने यांचा सत्कार करण्यात आला .
महाराष्ट्र विद्यालयातील माजी शिक्षक खोब्रागडे सर उदयभान रंगारी सर भोवते सर निकोसे सर मेश्राम सर उघाडे सर चहांदे सर सिडाम सर विकार सर मिराबाई ढोंगे सरिता कावळे उषाताई खोब्रागडे अंजलीताई खोसे आधी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.स्नेह मिलन सोहळ्याचे सहयोगी सिद्धार्थ वासनिक ,चोका भैसारे ,माणिक भरद्वार विजय श्रीदेमवार ,गुलाब मेश्राम पांडुरंग नैताम मुकुंदा सांगोडकर नरेश मेहता बाळू टेंभुर्णी नंदकिशोर मेहेरे नरेश सोनटक्के कांतीलाल बर्डे उमाजीपदा सुरेश बाबणवाडे सिद्धार्थ साखरे अनिल बोधनकर पुरुषोत्तम पेंदा श्रीराम खापरे दामोदर भेदे माणिक मेश्राम रामचंद्र कन्नाके अण्णाजी कन्नाके सूर्यभान गिराम शिष्य सहारे तक्षशिला भानारकर पुष्पा लांजेवार सुनंदा बोधनकर शीला बुडणे मायासाव संगीता बावनकर भावना सोनटक्के अलका चौधरी पुष्पा भोईर सोनू कुमरे आदी महाराष्ट्र विद्यालयातील माजी विद्यार्थी स्नेहमीलन सोहळ्यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानियुक्त शिक्षक एस. एस. खोब्रागडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक व माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, प्रा. आनंद मेश्राम, प्रा. हरीचंद्र नीकोसे, प्रा. तुळसीदास सिडाम, प्रा. धनराज उघाडे, प्रा. उदयभान रंगारी, प्रा. गिरिधर चहांदे, प्रा. रामकृष्ण विखार, सरिता कावळे, अंजली कोसे, उषा खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मेश्राम, प्रलय सहारे, प्रा. प्रदीप बोडने मंचावर उपस्थित होते.
सनेहमिलन सोहळ्यामध्ये महिलांना साडीचोळी प्रदान करून महिलांच्या सन्मान करण्यात आला.
स्नेह मिलन सोहळ्याचे मुख्य आयोजक रवींद्र मानकर
कार्यक्रमाचे संचालन वैरागड येथील सोने-चांदी व्यापारी व माजी विद्यार्थी सुभाष हर्षे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गुरवळा येथील शिक्षक व माजी विद्यार्थी अरविंद मेश्राम यांनी मानले.
स्नेह मिलन सोहळ्याची संकल्पना व आयोजन
ठिकाण ;महाराष्ट्र विद्यालय वैरागड
आयोजक; रवींद्र मानकर पोलीस हवालदार
सूत्रसंचालन: सुभाष वर्षे हर्ष ज्वेलर्स वैरागड
आभार प्रदर्शन: प्राध्यापक अरविंद मेश्राम
सहयोगी व मित्रपरिवार माणिक भारद्वार पोलीस हवालदार चोखाजी भैसारे पोलीस हवालदार नरेश नैताम पोलीस हवालदार सिद्धार्थ वासनिक पोलीस हवालदार विजय श्रीपेमवार शिक्षक प्रमोद ढोंगे वकील आधी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेतील माजी शिक्षकांचा सत्कार महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रमुख अतिथी गणमान्य व्यक्ती माजी विद्यार्थ्यांचे पाल्य या सर्वांच्या सहकाऱ्यांनी स्नेहमीलन सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
स्नेह मिलन सोहळ्यात विशेष म्हणजे स्नेह मिलन सोहळ्याचे औचित्य साधून व्हेज नॉनव्हेज जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments