पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या कर्जेली गावातील गरोदर मातेला प्रसूती करिता हिरोंचा येथे केले दाखल, पूर् नियंत्रण टीमची कौतुकास्पद कामगिरी...




गडचिरोली 
सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
प्रा. मुनिश्वर बोरकर
 संपादक
गडचिरोली
सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या टोक्यावर रमेशगुडम ग्रामपंचायत मध्ये येणारे कर्जेली गावाच्या गरोदर माता नाव सोनी संतोष आत्राम वय. 25, गरोदर पणाची अपेक्षित तारीख, 27/07/2024, होती, कर्जेली गावाजळील नाल्याला पूर आला असुन गरोदर माताला सुरक्षित स्थळी पोहचविणे गरजेचे होते तरी प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर, येथील आरोग्य चमूने शर्तीचे प्रयत्न करुन डोंग्याने मातेला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. नंतर सदर मातेला प्रसूती करीता रूग्णवाहिकेने सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालय येथे पोहचविण्यात आले. सदर कर्जेली येथे नाल्याला पुल नसल्याने पावसाळ्यात माहे जुलै ते नोव्हेंबर या 4 महिण्याकरीता सदर गावाचा संपर्क तुटत असून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात नेहमीच अडचण निर्माण होत असते.


सदर मातेला सुरक्षित पणे योग्य स्थळी स्थलांतरीत करण्याकरीता प्रा.आरोग्य केंद्र, झिंगानूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मारबोनवार, प्रयोग.वैज्ञा.अधि.मोहित ठाकरे, औ.नि.अ.होकम,आ.सहाय्यक दब्बा, आ.सहा.पटेल, व ईतर कर्मचारी व्रुंद यांनी मोलाची कामगिरी केली.

सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणारे कर्जेली ह्या गावाचा संपर्क पावसाळ्यात जुलै पासून नोव्हेंबर 4 महिण्यापर्यंत ईतर गावांशी तुटलेला असतो. सदर गावाच्या पुर्वेला इंद्रावती नदी व उत्तर / दक्षिण दिशेला दोन मोठे नाले आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना नेहमी त्रास सहन करावा लागतो.

0/Post a Comment/Comments