खोल दरीमध्ये युवक व युवती यांनी उडी घेऊन केली आत्महत्या ....प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा वर्तविण्यात येत आहे अंदाज...

 गडचिरोली सुपरफास्ट

न्यूज वृत्तसेवा 

तालुका प्रतिनिधी वणी 

 वनी येथील सुप्रसिद्ध असलेल्या गडावर जावून   चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन युवक व युवती यांनी आत्महत्या केली .
मिळालेला माहितीनूसार नामे मंगेश राजाराम शिंदे राहणार भापडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक व युवती हे वडनेर जिल्हा नाशिक येथून वनिला आले होते. वणीला  आल्यानंतर या दोघांनी वणी येथील गडावर जाऊन खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली दरीमध्ये युवतीचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेमध्ये दिसला तर मुलाच्या मृतदेह दरी  मध्ये आढळला या घटनेची माहिती स्थानिक गुराख्याने दिंडोरी येथील पोलीस पाटील चव्हाण यांना दिली लगेच पोलीस पाटील चव्हाण यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन

 झालेल्या घटनेचा पंचनामा केला व दोन्ही मृतदेह ताब्यात पण पंचनामा केला .घडलेल्या घटनेला सात ते आठ दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या स्थितीमध्ये होते यामुळे मृताचे शवविच्छेदन  करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांना बोलावलं असतं त्यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन केले .सदर युवक व युवती यांनी गडावर जाऊन खोलदरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करणे म्हणजे याच्यामागे काय कारण असावे हे सध्यातरी अस्पष्ट आहे मात्र परिसरात सदर युवक व युवती  यांचे प्रेम प्रकरण असावे आणि यातूनच दोघांनी दरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे सदर घटनेचा तपास वणी  पोलीस करीत आहेत.0/Post a Comment/Comments