तालुक्यातील डोंगरगाव केंद्राकडून
 आरमोरी :- तालुक्यातील डोंगरगाव केंद्राकडून दिनांक 1 मे 2023 ला केंद्रातील  जि.प.प्राथ.शाळा ठाणेगाव नवीन   येथे  २०२२-२३ या सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार व निरोप  समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.सी. सलामे शिक्षण विस्तार अधिकारी आरमोरी, उद्घघाटक  एन.डी.कोकुडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी , प्रमूख पाहुणे नलिनी शेडमेखे केंद्रप्रमुख, शंकर कुकडकार अध्यक्ष शा.व्य. स. ठाणेगाव , सौ.शैला निमकर(उपाध्यक्ष), सदस्य शैलेंद्र गजभिये, प्रमोद भूरसे, खुशाल नैताम तसेच केंद्रातील सर्व शिक्षकवृंद  उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये  जी.बी. राठोड जेष्ठ शिक्षण  विस्तार अधिकारी,  आर.के.सोमनकर उच्च श्रेणी मुख्याध्यापक,सौ. एम. एम. मने , सौ. डी.बी.चुटे , गंगाधर भोयर  , आशा चिलमवार यांचा केंद्रातील  शिक्षकातर्फे शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार व निरोप  करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या सेवाकाळाचा गौरवपूर्ण उल्लेख मनोगतातून व्यक्त केला.आपण आयुष्यभर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी कार्य केल्याचे   आर. के सोमनकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मेश्राम  व कु.शितल चापले  यांनी केले तर आभार सचिन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील मुख्याध्यापक सी . एम. बांबोळे, यु. एन. मसराम, पी . एम. कुंभारे, एम. एम. कुळमेथे  तथा केंद्रातील सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments