जड वाहतूकिमुळे घोट, निकतवाडा, रेगडी रस्त्यावर खड्डेच खड्डे, रस्ता दुरुस्तीची विशाल दहिवलेची मागणी...

गडचिरोली सुपरफास्ट
 न्यूज वृत्तसेवा 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


घोट - चामोर्शी तालुक्यातील घोट निकतवाडा ते रेगडी जाणाऱ्या रस्त्याची चाळण झालेली आहे. अनेक ठिकाणी खड्डेच - खड्डे पडल्यामुळे सदर रस्त्याची दैनिय अवस्था झाली असुन संबंधित विभागाने रस्त्याची दुरस्ती करावी अन्यता उपोषणाला बसण्याचा ईशारा रिपब्लिकन पार्टीचे सरचिटणीस विशाल दहिवले घोट यांनी दिलेलाआहे.
घोट ते रेगडी १५ कि.मी चा रस्तावर लोडेट ट्रका जातात एस.टी महामंडळाच्या बसेस जातात कन्नमवार जलाशय रेगडी येथे पर्यटनसाठी फोर व्हिलर जात असतात त्यामुळे रस्त्याची दैनिय अवस्था झालेली असुन रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असुन खंड्यात पाणीच पाणी साचले आहे.सदर रस्त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष दिसते. त्यावेळेच रिपाई तर्फे आंदोलन केले असता सुरजागड कंपणीवाल्यांनी चुरी टाकून डागडुगी केली होती. आता तर सदर रस्त्यावरून टु व्हिलर फोर व्हिलरचे आवागमण करणे कठीण झालेले आहे. अश्या परिस्थितीत सार्व. बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवावे रस्त्याची डागडुगी त्वरीत करावे अन्यता उपोषण छेडण्यात येइल अश्या प्रकारचा ईशारा प्रशासनाला आयपिआयचे सरचिटणीस विशाल दहिवले दशरथ वाकडे राकेश चांदेवार आदिनी दिलेला आहे.

0/Post a Comment/Comments