गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
नागपूर :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्ह्याच्या एक दिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नागपुर जिल्ह्यातील कार्यकर्त्यां व्यतिरिक्त भंडारा , भद्रावती चंद्रपूर व रायपूर शाखेचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून बुवाबाजी चमत्कार प्रशिक्षणचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दै बहुजन सौरभ या अग्रगण्य दैनिकाच्या निवासी संपादक प्रा संध्या राजुरकर उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संविधान जागर अभियानाचे प्रा.स्वप्निल फुसे,एड् मोनाली अर्पणा पुणे व डॉ प्रा स्मिता शेंडे उपस्थित होते.मंचकावर राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे, उ ना चे कार्याध्यक्ष देवानंद बडगे व उपाध्यक्ष गौतम पाटील उपस्थित होते. शिबीराचे उद्घाटन पाण्याचा दिवा पेटवून अध्यक्षा व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात
आले.संविधान उद्धेशीकेचे वाचन वर्षा टेंभेकर यांनी केले,तर प्रस्तावनेत कार्यक्रमाचे औचित्य सांगतांना चित्तरंजन चौरे म्हणाले की आज रा.का. सदस्य रामभाऊ डोंगरे यांची रेल्वेच्या नौकरीतुन सेवानिवृत्ती आहे व आजच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन पण केले आहे असा दुग्धशर्करा योग आजच्या कार्यक्रमाला लाभला आहे.
या प्रसंगी सर्व प्रमुख अतिथींनी आपआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा संध्या राजुरकर म्हणाल्या की महाअंनिस चे संस्थापक दिवंगत डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी शेवटपर्यंत विवेकवादाला मानवतावादा ची सांगड घालून सर्व धर्म समभाव राखत, विवेकवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन समाजात रुजवीला.व विवेकाचा आवाज बुलंद केला. या प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांचा समीतीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ पुस्तकं व भंगवान बुद्धाची मूर्ती देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना रामभाऊ म्हणाले की हा माझा सत्कार नसुन कार्यकर्त्यांचा सत्कार आहे. त्यांच्या त्यागाचा सत्कार आहे.कार्यकर्ते आहेत म्हणून मी आहे.
भोजन अवकाशा नंतर विविध शाखेवरुन आलेल्या कार्यकर्त्यांना देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे यांनी बुवाबाजी व चमत्काराचे प्रशिक्षण दिले व त्यांच्या करवी प्रात्यक्षिके करवून घेतले.त्यात प्रामुख्याने मंत्राने उदबत्ती फिरविणे, अलौकिक शक्तीने जिभेतून त्रीशुल आरपार काढणे,जळता कापूर खाणे, मंत्राने हवण पेटविने, अखंड रस्शी कापून जशी ची तशी जोडून देणे ई.बारा चमत्कार संलग्न आहेत.
या प्रसंगी "ठोका केला व माय " हे ज्योत्स्ना बनसोड दिग्दर्शित व रंगराज गोसावी लिखित अंधश्रद्धे वर आधारित नाटक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सफल सूत्रसंचालन प्रा पुष्पा घोडके तर आभारप्रदर्शन वर्षा साहरे यांनी केले.
कार्यक्रमाला रतन गोंडाने रायपूर, भैय्या लाल भैसारे व टिम भद्रावती, आनंद मेश्राम,चंदा मोटघरे, विजया ठाकरे,अशोक राऊत ,गंगा हस्ते चंद्रपूर, छाया सोनटक्के बल्लारशा, नरेश महाजन,शारदा मोटघरे,गंगा खांडेकर, प्रियंका नंदेश्वर,रेखा पाटील, शोभा पाटील,अरविंद तायडे वंदना शहारे भंडारा, चंद्रभूषण मेश्राम भीवापूर,माही वसंत मोहीले, माया अविनाश सुखदेवे विलास धोंगडे ,इंदू उमरे, मंगला गाणार, सुनिता रमेश ढवळे,प्रा लोणारे,नंदा भगत,माधूरी मेश्राम ,प्रतीक्षा सोनवाने, कल्पना डोके,गिता विजय सुरवाडे, उत्तम सालवनकर,विवेक निमगडे,विजय पारधी,सुधा जनबंधु, रंजना ठवरे,एड् मनोहर गजभीए, तनूजा झिलपे ,कामीनी बनकर ,मंजू पोफरे, विजया ठाकरे,सुधिर सोनटक्के, वंदना टेंभुर्णे, शिला ढोणे,शिला डोंगरे व नागपूर जिल्ह्यातील सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*****




Post a Comment