ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज येथे हनुमान जयंतीनिमित्त प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न, मा. खासदार डॉ. अशोकजी नेते यांची प्रामुख्याने उपस्थिती...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
ब्रह्मपुरी ब्युरो 


ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा निलज येथे रामनवमी व हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित भागवत सप्ताह, रामकथा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची उत्साहात सांगता झाली. या पावन पर्वावर नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने पार पडली.


या भव्य अध्यात्मिक सोहळ्याला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले “या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील एकोप्याचे दर्शन घडले. विविध पक्षांचे नेते एकत्र आले, हे निश्चितच स्तुत्य आहे. गाव आणि मंडळांनी घेतलेली पुढाकार प्रशंसनीय आहे. भागवत सप्ताहामुळे चांगले विचार आत्मसात करून कृतीत आणले, तरच या कार्यक्रमाचे खरे फलित लाभेल,”असे प्रतिपादन मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केले.
या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने महाआरती करण्याचा सन्मान लाभल्याबद्दल “हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि आध्यात्मिक समाधान देणारे क्षण होते.”
यावेळी त्यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत सांगितले कि “रेल्वे, वैद्यकीय व कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, चिचडोह व कोटगल बॅरेज, रस्ते अशा अनेक विकासकामांवर मी भर दिला. पराभव जरी झाला तरी गावाबद्दलचं प्रेम आणि जनतेबद्दलचं कर्तव्य अजिबात कमी झालेलं नाही. मी आजही जनतेच्या संपर्कात आहे आणि भविष्यातही राहीन.”


या सप्ताहात निलज गावात ध्यानपठ, रामधून, पालखी मिरवणूक, कलश यात्रा, हरिपाठ, भजन-कीर्तन, श्रीरामकथा, गोपाळकाला यांसारख्या विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय व आध्यात्मिकतेने भारावून गेला.

यावेळी प्रामुख्याने गटनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, डॉ. बालपांडे साहेब, सामाजिक नेते नानाजी तुपट, कृ.उ.बा.स. संचालक यशवंत आंबोरकर, माजी



 सभापती रामलाल दोनाडकर, तसेच अनिल तिजारे (सरपंच, तळोदी खुर्द) यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ, वयोवृद्ध भक्तगण आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments