डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे उत्साहात साजरी, मा. खासदार डॉ. अशोक नेते यांचे समारोपीय मार्गदर्शन उपस्थितीत जनसागराने व्यक्त केला जय भीमचा जयघोष....

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो 


गडचिरोली, १४ एप्रिल २०२५ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे महानायक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे अत्यंत उत्साहात, प्रेरणादायी आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरी करण्यात आली.


या गौरवशाली सोहळ्याची सुरुवात मा.खा. डॉ. अशोकजी नेते (भा.ज.पा अनुसूचित जनजाती मोर्चा – राष्ट्रीय महामंत्री) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी 'जय भीम'च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकत महामानवाला सामूहिक अभिवादन केले.


यावेळी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. गीता हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ तिडके, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, ता. महामंत्री रमेश नैताम, विनोद देवोजवार, दलित नेते देवाजी लाटकर, जनार्दन साखरे, उराडे सर, केशव निंबोड, अविनाश विश्रोजवार, कीर्ती मासुरकर, गुड्डभाऊ सरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमात बोलताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी बाबासाहेबांचे संविधानिक, शैक्षणिक आणि सामाजिक योगदान विषद करत नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा स्वीकार करून आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. "डॉ. आंबेडकर हे केवळ दलितांचेच नव्हे तर समस्त भारतीयांचे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांचा प्रकाश आजच्या तरुणाईने आपल्या जीवनात उतरवणे हीच खरी अभिवादनाची भावना आहे," असे बोलत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समस्त जनतेला शुभेच्छा देत जय भिम असे बोलत प्रतिपादन केले.

कार्यक्रम संपूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सर्व जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments