फराडाच्या ॲट्रॉसिटी मध्ये गुन्हा दाखल होवुनही गुन्हेगारांना चामोर्षी पोलिसांचे अभय तर नाही ना...मुनिश्र्वर बोरकर 
संपादक 
चामोर्शी 
फराडा च्या ॲक्ट्रोसिटी मधे गुन्हा दाखल होवूनही गुन्हेगारांना चामोर्शी पोलीसाचे अभय तर नाही ना ! गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील फराडा येथील अनुसुचित जातीच्या एका महिलांना भर चौकात जातीवाचक शिविगाळ केल्यामुळे त्या महिलेच्या रिपोर्टनुसार गैरअर्जदारावर ॲक्ट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल होवूनही गुन्हेगार मोकडा फिरत आहे. तेव्हा गुन्हेगारास चामोर्शी पोलीसाचे अभय तर नाही ना अशी उलट सुलट चर्चा सदर परिसरात सुरु आहे. सविस्तर माहिती अशी की फराडा येथील सरपंच्या अनिता गुरुदास जिल्लेपल्लीवार यांनी दि ११ / ६ / २४ ला गुरुदास चुधरी फराडा यांच्या विरोधात रिपोर्ट दिला असता चामोर्शी पोलीसांनी व SD po गडचिरोली ने तपास करून त्यांचेवर कलम २९४ , ५०९ , 506 ' 3 (2) अन्वये अनु जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु १५ दिवश लोटूनही चामोर्शी पोलीसांना गुन्हेगारास पकडले नाही. गुन्हेगार पोलीसांना न सापडणे म्हणजे चामोर्शी पोलीस गुन्हेगारास अभय तर देत नसावे ना अशी फराडा परिसरात चर्चा सुरु असुन गुन्हेगारास तात्काळ अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे तालुका प्रमुख विजय देवतळे फराडा यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments