गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली - अंधश्रद्धा दुर करून विज्ञानाचा स्विकार केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही कारण दारिद्र व अज्ञान हे कारणीभुत घटक आहेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत जाखी यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर गाणली सभागृह गडचिरोली येथे संपन्न झाले. शिबिराचे उदघाटन डॉ. चंद्रशेखर डोंगरवार यांचे हस्ते तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन डॉ. दिपक माने सातारा इंजि. सम्राट हटकर नांदेड डॉ. प्रा सुशिल भगत रामभाऊ डोंगरे नागपुर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य राजन गजभिये डॉ. शंतनु पाटिल ,देवयानी भगत प्रा. पुप्पाताई धोडके शांतीदुत प्रकाश अर्जुनवार चंद्रशेखर भंडागे आदि लाभले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक इजि. सम्राट हटकर म्हणाले की अंधश्रद्धा हि समाजाला लागलेली किळ आहे त्यामुळे विकासासाठी विज्ञानाची कास धरा. तर प्राचार्य गजभिये म्हणाले की , अंधश्रध्देमुळे बहुजन समाज बळी पडल्याने दुख व दारिद्र भोगावे लागत आहे.
कार्यक्रमास कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर यांना प्रास्ताविक तर भोजराज कान्हेकर यांनी आभार मानले . कार्यक्रमास सम्मया पसुला ॲड खोबागडे . गोपाल रायपुरे, मारोती भैसारे दशरथ साखरे विकास दहिवले प्रमोद राऊन ॲङ शांताराम उंदिरवाडे ,डोमाजी गेडाम ' प्रमोद सरदारे , मोहनदास मेश्राम ' तुळसिराम सहारे , टिएम खोब्रागडे अशोक शामकुळे गायक विजय शेंन्डे रोशन उके रामनाथ खोब्रागडे जिवन मेश्राम सोनु साखरे , दिनेश वनकर हर्ष साखरे चोखोबा ढवळे श्रीरंग उंदिरवाडे प्रमोद बांबोळे दामोदर शेंन्डे प्रेमदास रामटेके लवकुश भैसारे मदन उराडे राजु उंदिरवाडे , गुरुदेव भोपये , एमडी चलाख , अशोक अंबादे,लालाजी नगराळे यशवंत वंजारे ,महेंद्र ठाकरे हेमंत बारसागडे अनमोल डोंगरे संघमित्रा राजवाडे , लता रामटेके .निशाता बोदेले लता भैसारे प्रेमलता उंदिरवाडे माया मेश्राम विभा खेवले सुनंदा बांबोळकर रोजा घागरगुंडे प्रेमलता कान्हेकर वृशाली उंदिरवाडे स्वाती वंजारे नरेंद्र शेंन्डे लोपा विजय शेंन्डे ' आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment