पाथरी येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था गिरगावच्या शाखेचे उद्घाटन माजी आमदार अतुल देशकर यांच्या हस्ते पार पडले...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


पाथरी - सावली तालुक्यातील पाथरी जवळील गिरगांवचा लक्ष्मी नागरी पथसंस्थेचे उदघाटन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांचेहस्ते पार पडले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान हे होते. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार अतुल देशकर म्हणाले की लक्ष्मी नागरी पथसंस्था पाथरी प्रमाणेच गिरगांव येथेही प्रगती पथावर जावो व भरभराठीस येवो अश्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी सरपंच अनिताताई ठिकरे, माजी सभापती प्रफुल खापर्डे, पत संस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर, माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ सिद्धम, नागराज गेडाम, शरदराव सोनावणे,



 रमेशपाटील ठिकरे, नारायणराव गुरनुले, गुरूदासजी चावरे, श्यामरावजी बोरकर, माजी जि प सदस्य खोजराम मरस्कोले, येदुनाथ गिरडकर, तुकाराम पाटील ठिकरे, दिलीपभाऊ जाधव, कमलेशजी चारपे, प्रमोदभाऊ दसगाये, स्वातीताई सोनावणे, विद्याताई गिरडकर, कृष्णा गुरनुले, हरिदासजी ठाकरे, मिथुन बबनवाडे, अक्षय घोटेकर, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने नगरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments