अखेर आमदार रामदास मसराम यांचे प्रयत्नाने आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृह सुरू..

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी - आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन सर्वांगिण विकास होण्यासाठी शासनाने आदिवासी मुला-मुलींसाठी शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी वस्तीगृह महत्त्वाची आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य आणि निर्वाह भत्ता मिळतो यासोबतच उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह विविध भौतीक सुविधा वसतीगृहातील आदिवासी मुला मुलींना मिळत असतो परंतु आरमोरी येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह जेवनाची व्यावस्था झाली नसल्यामुळे एक महिण्या पासून वस्तीगृह सुरू झाले नसल्याच्या समस्या मुला मुलींच्या पालकांनी आमदार रामदास मसराम यांच्या कडे सांगितले होते याची दखल घेऊन आमदार रामदास मसराम आरमोरी येथील मुला मुलींच्या वसतिगृहास भेट देऊन पाहणी केली असता एकही मुल मुली वसतिगृहात आढळले नाही यावरून वस्तीगृहाचे अधिक्षक यांना विचारले असता जेवणाची व्यवस्था होण्यास विलंब झाल्याने वस्तीगृह सुरू करण्यात आले नसल्याने तसे पाहता गेल्या महिन्याच्या 23 जुनला शाळा सुरू झाल्या त्या आगोदर पुव तयारी आदिवासी विभागाला करायला पाहीजे होती परंतु एक महिन्याच्या वरुण दिवस झाले पण वस्तीगृहाची साफ सफाई नाही खोल्याच्या खिडक्याचे पले व काही काच तुटले असताना रीपेरीग न केल्याने मुला मुलींना वस्तीगृहात आल्यावर पावसाच्या पाण्यानी भिजण्याची वेळ आली आहे. या वस्तीगृहात वग ८ ते एम ए. पयत शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना प्रवेश मिळतो शमता मुलांच्या वसतिगृहात १७५ सध्या ७७ अज प्राप्त झाले आहे आणि एका मुलामागे ३ हजार १२० रुपये अनुदान भोजन व्यवस्था करणारेना मिळतात परंतु एक महिन्यापासून वस्तीगृह सुरू न झाल्याने मुला मुलींच्या शैक्षणिक नुकसान होत बाब पाहणी दरम्यान समोर आली या आदिवासी विभागाच्या सावळा गोंधळ कारभारावर रोष वेथ करुन सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रंजित यादव यांना तातडीने अंमलबजावणी करुण आरमोरी येथील आदिवासी मुला मुलीचे वस्तीगृह सुरू करण्याची मागणी केली . होती याची दखल घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रंजित यादव यांनी आदेश काढुन काल पासून भौतिक सुविधेचे कामे हाती घेऊन नियमित आरमोरी येथील मुला मुलींचे वसतिगृह सुरू झाल्याने आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नाला यश आल्याने मुला मुलींच्या पालकांनी आमदार मसराम यांचे आभार मानले .

0/Post a Comment/Comments