पत्नी व प्रियकराची मारहाण जिव्हारी लागल्याने पतीने केली आत्महत्या....गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
जिल्हा प्रतिनिधी जळगाव

 : घरी येऊन पत्नीशी

शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या प्रियकरास नकार दिल्याच्या रागातून पत्नी व तिच्या प्रियकराने पतीला बेदम मारहाण केली. मारहाण व पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याने जबर धक्का बसलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस कारणीभूत ठरलेली पत्नी व तिचा प्रियकर दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

१५ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता सदर तरुण प्रेयसीच्या घरी गेला. तेथे मृताच्या पत्नीशी शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यास विरोध केल्याने तरुणासह मृताची पत्नी या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याने, तरुणाने २ जुलै, २०२४ रोजी विष प्राशन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ४ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल होवुन
मृताची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments