गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील गोलबंदरी येथील बुद्ध विहारात आरपिआयची बैठक आरपिआयचे जेष्ठ नेते चक्रपाणी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे सरचिटणीस विलास दहिवले सचिव प्रदिप वाकडे मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बारसागडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली .
सदर बैठकीला मार्गदर्शन करतांना प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की ,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित एकमेव रिपाई पक्ष आहे. या पक्षाच्या वाढीकरीता आपण सर्वांनी सहकार्य करावे समाज एकसंघ राहण्याचा प्रयत्न करावा अश्या प्रकारचे मार्गदर्शन बोरकर यांनी केले.
सदर बैठकीला मंगेश निमगडे सोमचक्र कोसमकर कालीदास खोब्रागडे भोजराज गणविर रुपेश कोसनकर विमलाताई कोसनकर पियंका बारसागडे गिर र्जुला निमगडे सहीत बहुसंख्य बांधव उपस्थित होते.
Post a Comment