पाथरगोटा येथे गावकऱ्यांच्या वतीने मा .आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार व गौरव....


गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


*दिनांक:- ०६ सप्टेंबर २०२५*

आरमोरी/पाथरगोटा 
:-- श्री बाल गणेश उत्सव मंडळ पाथरगोटा यांच्या वतीने आयोजित संगीत नाटक "रुसली साडी माहेरची" या नाटकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी पाथरगोटा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा मंडळातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

स्वतंत्र ग्रामपंचायतचा प्रश्न मार्गी... गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला पाथरगोटा ग्रामपंचायतीचा प्रश्न माजी आमदार कृष्णा गजबे यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावला. पळसगाव ग्रामपंचायतमधून वेगळे करून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून पाथरगोटा ग्रामपंचायतची स्थापना झाली आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ११०० असून, सुविधांचा अभाव असल्याने गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली होती. जिल्हा परिषदेतून शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे.

आरक्षणाचा वाद कायम
गावात अनुसूचित जमातीची संख्या नसतानाही १९८०-८५ च्या अधिसूचनेनुसार नवरगाव व पाथरगोटा हे पेसाच्या यादीत समाविष्ट असल्याने येथे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. परिणामी ओबीसी व इतर प्रवर्गातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या प्रश्नावर देखील माजी आमदार गजबे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याची माहिती देण्यात आली.

या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यास माजी आरोग्य सभापती भारतभाऊ बावनथडे, भाजप तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू नागतोडे, अमोल खेडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नाटक उद्घाटनाप्रसंगी बोलताना माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, “ग्रामपंचायत मिळविण्याचे श्रेय पाथरगोटावासीयांच्या एकजुटीला जाते. खरे मानकरी तुम्हीच आहात.”

सत्काराला उत्तर देताना त्यांनी ग्रामपंचायत मिळविण्याच्या प्रवासाची आठवण करून दिली. “ग्रामपंचायतच्या मंजुरीसाठी फाईलला ग्रामपंचायतीतून पंचायत समितीकडे, पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे, जिल्हा परिषदेतून कमिश्नर ऑफिसकडे आणि तिथून मंत्रालायपर्यंत टेबल टू टेबल स्वतः नेऊन मंजुरी मिळवावी लागली. हा प्रवास सोपा नव्हता, पण गावकऱ्यांच्या पाठबळामुळे हे मला करणे शक्य झाले,” असे गजबे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments