सामाजिक कार्यकर्त्या शितलताई सोमनानी यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवून, समाज कार्य करावे... जनतेच्या मनातून व्यक्त होत आहेत भावना...

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर मुख्य
संपादक
7822082216




आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील प्रसिद्ध सामाजिक
कार्यकर्त्या शितलताई बलराम (भोलुभाऊ) सोमनानी यांनी आगामी 2025-26 ची जिल्हा परिषद निवडणूक लढवून समाजकार्य करावे अशा मनभावना वैरागड  परिसरातील जनतेनी व्यक्त केल्या आहेत.. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शितलताई सोमनानी यांनी कोणत्याही राजकीय लाभाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे समाजकार्य केले आहे. त्यांनी विशेषतः गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी रोजगार मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले आहेत. एवढेच नव्हे तर शीतल ताई सोमनाणी यांनी वेळोवेळी गरजू गरीब महिलाना संकटाचे वेळी निस्वार्थपणे मदत सुद्धा केली आहे . गोर गरीब कष्टकरी शेतकरी वर्गातील महिलांना साळी चोळी देवून मान सन्मान सुद्धा दरवर्षी करीत असतात.या त्यांच्या



 निस्वार्थ सेवेमुळे आता जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने त्यांना राजकारणात येऊन नेतृत्व करण्याची मन भावना व्यक्त केली आहे. जनतेचा असा विश्वास आहे की शितलताई सोमनानी यांनी राजकारणात आल्यास त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देतील. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला एक असे नेतृत्व मिळेल जे लोकांच्या सुख-दुखात नेहमी मदतीला धावून येईल. म्हणूनच 'रणरागिणी शीतलताई, शीतलताई' असा जयघोष करत जनतेने त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची भावना व्यक्त केली आहे. शितलताई सोमनानी यांनी राजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट करावा आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी जनतेची एकमुखी मागणी सुद्धा जिल्हा वासियांच्या वतीने जोर धरू लागली आहे.
जनतेचा विश्वास पाहता शितलताई सोमनानी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करतील असा ठाम विश्वास जनतेला आता वाटू लागला आहे.

0/Post a Comment/Comments