दिभना गावाजवळील रोडवर हत्तीचा कळप ,वनविभागाकडून ड्रोन द्वारे शोध...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा
प्रा . मुनीश्वर बोरकर.
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील दिभना जवळीक । दिभना अमिर्झा रोडवर हत्तीचा कळप दिसला असून काही अंतरावर गडचिरोली वनविभागाच्या (RRT ) जलद बचाव दलाने हत्तीच्या कळपाचा शोध घेणे सुरु होते.
आज दि. १७ संष्टेंबर सायंकाळी ७. १५ चे सुमारास आयपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर व उपाध्यक्ष दशरथ साखरे आपल्या फोर व्हिलर गाडीने अमिर्झा ते दिभना मार्ग गडचिरोली येत असतांना अगदी दिडसे फुटाच्या अंतरावर हत्तीचा कळप आखो देखा हाल समजताच गाडी रिव्हर्स करून दुसऱ्या मार्गाने यावे लागले.


तिन कि.मी अंतरावर (RRT) जलद बचाव दल गडचिरोलीची टिम ड्रोन च्या सहाय्याने हत्तीचा कळपाचा शोध घेत होता तर अमिर्झा पटाजवळील रोडवर मडावी SF आपल्या टिम सहीत नैतान होते.
सोमवारच्या रात्रौ हत्तीचा कळप पिंपरटोला येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासधुस केली होती व आज अमिर्झा दिभना रोडवर हत्तीचा कळप होता.


हत्तीचा कळप दिवसभर पिंपरटोला जंगलात थांबुन बुधवारी सांयकाळी दिभना रोडवर वावर करीत होता अमिर्झा येऊ नये व दिभना गावात जावु नये म्हणुन वनविभाग अर्लट होती. अमिर्झा - दिभना परिसरातील नागरिकांनी सदर जंगल परिसरात कुणीही जावु नये अशी माहिती वनविभागाने देऊन सर्तकता बाळगली आहे .

0/Post a Comment/Comments