मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कोटगल येथे संपन्न....

गडचितोली सुपरफास्ट 
न्युज वृत्तसेवा .
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 




गडचिरोली - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम ग्रामपंचायत कोटगल येथे तंटामुक्तीचे अध्यक्ष मोहन ठाकरे यांच्याअध्यक्षतेखाली तर सरपंच ममता दुधबावरे माजी जि.प सदस्य दिवाकर भोयर प.स गडचिरोलीच्या खोब्रागडे मॅडम पटवारी तलांडे पोलीस पाटिल हेमंत मेश्राम ग्रामसेवक निलकंठ मारगाये यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मोहन ठाकरे म्हणाले की सदर अभियान हे ग्रामपंचायतीला लाभ मिळवुन देणारे अभियान आहे म्हणुन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेऊन श्रमदानातून गावाचा विकास करायला पा आपले गाव स्वच्छ ठेवायला पाहिजे तरच गावाचा विकास होईल असे ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.


याप्रसंगी माजी जि प सदस्य दिवाकर भोयर खोब्रागडे मॅडम तलाटी तलांडे कृषी सहाय्यक पेंदाम ग्रामसेवक मारगाये आदिनी आपल्या विभागाची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपसरपंच प्रेमलता भोयर निनाताई मेश्राम दिलीप कोरेवार गिरिधर मेश्राम पुरुषोत्तम बावणे शुकदेव खोब्रागडे आदि सहीत बहुसंख्य महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments