रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरची बैठक संपन्न...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
संपादक मुनिश्वर बोरकर 




गडचिरोली
चंद्रपुर -
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज़िल्हा चंद्रपूर ची बैठक स्थानिक शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज़िल्हा अध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे हे होते.
नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी वि. तू. बुरचुंडे, नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, राज्य सचिव गोपाल रायपूरे, रिपब्लिकन प्रचारक अशोक उमरे यांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम मोरेश्वर चंदनखेडे यांच्या नियुकी बद्दल अभिनंदन ठराव पारित करण्यात आला.
बैठकीत 3ऑक्टोबर24 रोजी पक्ष स्थापना दिना निमित्य नागपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा यशस्वी करने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणे, चंद्रपूर ज़िल्हा कार्यकारिणी चे गठन, ग्राम स्थरावरून पक्ष बांधणी करने. इत्यादी विषयावर गंभीरतेने चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
बैठकीत भद्रावती ता. अध्यक्ष संतोषभाई रामटेके, ब्रम्हपुरी ता. अध्यक्ष विजय रामटेके, बल्लारपूर ता. अध्यक्ष अजय चव्हाण, शहर अध्यक्ष अजय




 पाटील,वरोरा ता. अध्यक्ष अनिल वानखेडे,महिला आघाडी अध्यक्षा छाया लाभाने, शहर अध्यक्ष अरुण देवगडे, पोंभुर्णा ता. चे विजय उराडे, चंद्रपूरचे प्रा. जे टी लोणारे, ताकसांडे, शालिक रामटेके, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीस भद्रावती, वरोरा, बल्लारशा, कोरपना, गडचांदूर, ब्रम्हपुरी, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments