महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे मा .खा. डॉ. अशोकजी नेते यांची मुंबईत झाली भेट .

गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा


मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२५
आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल मंत्री ना.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट संपन्न झाली.


या भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यात आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या “सेवा पंधरवाडा – सेवा, सुशासन, गरीब कल्याण व आत्मनिर्भरतेच्या त्रिसूत्री” या भव्य अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच उद्या गडचिरोली येथे होणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधीही मार्गदर्शनपर चर्चा झाली.

मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोलीतील कार्यक्रमाचे तपशील माननीय बावनकुळे साहेबांना अवगत करून दिले. या वेळी गडचिरोली भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे तसेच ज्येष्ठ नेते श्री. धनंजय पडिशाला उपस्थित होते.




0/Post a Comment/Comments