मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बैठक संपन्न...

गडचिरोली सुपरफास्ट
 न्युज वृत्तसेवा 



गडचिरोली 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी ची मिटिंग पक्ष कार्यालयात 15 सप्टेंबर ला घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी वडसा तालुक्याचे तालुका सचिव कॉम्रेड. परसराम आदे होते.
या मिटिंगमध्ये जिल्हा सचिव कॉ.अमोल मारकवार यांनी संध्याची राजकिय व सामाजिक परिस्थिती वर मार्गदर्शन केले.
राज्य सरकार जनविरोधी कायदे करून शेतकरी, शेतमजुरी, कामगारांना लुटण्याचा काम करीत असल्याची टिका केली.
जन सुरक्षा विधेयकाच्या नावाने जनतेचे संविधानिक अधिकार नाकारण्याचा डाव राज्य सरकार करत आहे.
एकिकडे राज्यात मोठि आर्थिक गुंतवणूक येत आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सागत आहेत . पण त्याच्याच विदर्भात देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. हा विकास नसुन विनाश असल्याने मत कॉ. अमोल मारकवार यांनी व्यक्त केले.
संयुक्त किसान मोर्चा चे राष्ट्रीय नेते दिनांक 17/18/19 सप्टेंबर ला विदर्भदोर्यावर येनार आहे. आत्महत्या शेतकर्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भेट घेणार आहेत.व शेतकर्याच्या आंदोलनाची दिशा ठरवनार आहेत.
या मध्ये किसान नेते राकेशजी टिकैत , डॉ.अशोक ढवळे, डॉ. अजित नवले राहाणार आहेत. यासाठी गडचिरोलीवरुन 10 प्रतिनिधी जाणार आहेत.
या मिटिंगमध्ये आगामी जि.प , पं.स व नगरपालिका च्या निवडणूका लढविण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला.
मिटिंगमध्ये तालुका सचिव राजु सातपुते, विठ्ठल प्रधान,किसन राऊत, वासुदेव निखारे, ब्रम्हदास बावणे , बाबुराव मोहुर्लू, भगवान राऊत, सुनिल दुमाने, कविता मेश्राम, प्रमोद कोसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments