बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासंबंधीची मक्केपल्ली येथे बैठक संपन्न...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील महामाया बुद्धविहार मक्केपल्ली येथे आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षते खाली तर उपाध्यक्ष मारोती भैसारे सरचिटणीस विशाल दहिवले सचिव प्रदिप वाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की , दि. १९ सप्टेंबर २०२५ ला राजीव भवन गडचिरोली येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमात भन्ते विनाचार्य भन्ते आकाश लामा भन्ते ज्ञानज्योती आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे तर सुप्रशिद्ध गायक विकास राजा यांच्या भिमगिताचा कार्यक्रम होणार आहे तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. बोरकर यांनी केले.


सदर बैठकीला संजय वाकडे रुपेश वनकर चरणदास वनकर अशोक मुजुमकार नारायण निमगडे राहुल मेश्राम वैभव खोब्रागडे यशवंत रामटेके दिक्षा वाकडे शुशीला मुजुमकर रेखा रामटेके गिता गणविर आदिसहित बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments