भिवंडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ऑल सेंट्स शाळेचा सर्वस्व दळवी अव्वल...


गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
प्रतिनिधी : दिलीप अहिनवे


भिवंडी, दि. १६ : भिवंडी तालुकास्तरीय शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पडघा येथील आर. के. पालवी विद्यालयात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटात १८० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. प्रत्येक वयोगटातील पहिल्या ५ खेळाडूंची निवड करण्यात आली. यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दि. २९ सप्टेंबर रोजी पडघा स्थित आर. के. पालवी विद्यालयात होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत हे निवड झालेले खेळाडू भिवंडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धांचे उद्घाटन आर. के. पालवी विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पालवे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक समीर सूर्यवंशी व भिवंडी तालुका क्रीडा केंद्रप्रमुख गुणवंत बेलखेडे हे उपस्थित होते. पंच म्हणून मयूर मोरे (अंबरनाथ) व राहुल टाक (बदलापूर) यांनी उत्तमरीत्या काम पाहिले.


स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे :

१४ वर्षाखालील मुले :
१) सर्वस्व स्वप्नील दळवी – ऑल सेंट्स हायस्कूल
२) हार्दिक माळी – होली मेरी कॉन्व्हेंट हायस्कूल
३) निरव चौघुले – होली मेरी कॉन्व्हेंट हायस्कूल
४) आरुष राणे – युरो स्कूल, अप्पर ठाणे
५) अंबाराम चौधरी – प्रेसिडेन्सी स्कूल

१४ वर्षाखालील मुली :
१) इकरा फारुकी – होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल
२) अद्विका एरंडे – ऑल सेंट्स हायस्कूल
३) स्वरा वटारी – होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल
४) इशाना गुप्ता – ऑल सेंट्स हायस्कूल
५) आरवी मारु – होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल

१७ वर्षांखालील मुले :
१) यश पुजारी – होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल
२) क्रिशांग पालवे – ऑल सेंट्स हायस्कूल
३) ऋषित देशमुख – होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल
४) अर्णव बोरसे – ऑल सेंट्स हायस्कूल
५) आदित्यप्रसाद जोशी – देविका इंग्लिश मीडियम स्कूल


१७ वर्षांखालील मुली :
१) शेनबागादेवी नाडर – लिओ इंटरनॅशनल स्कूल
२) रिषा खरबे – होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल
३) नैत्रिषा आचार्य – श्रीमती एल. बी. जोशी इंग्लिश हायस्कूल
४) सान्वी शर्मा – युरो स्कूल, अप्पर ठाणे
५) प्राप्ती म्हात्रे – शुभम इंग्लिश मीडियम स्कूल

१९ वर्षांखालील मुले :
१) राज अड्डापल्ली – श्री महादेव चौघुले महाविद्यालय, राहनाळ
२) तुषार सिंग – ग्लोबल इंग्लिश स्कूल, काल्हेर
३) सोहेल शेख – के. एम. ई. एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेज

१९ वर्षांखालील मुली :
१) हिंदवी प्रजापती – शारदा विद्यालय, शेलार

0/Post a Comment/Comments