जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या 165 व्या जयतिनिमिती विविध कार्यक्रमाचे आयोजन....



गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
प्रा. मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली 
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या 165 व्या जयंतीनिमित्त, म्हणजेच अभियंता दिनानिमित्त, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व अभियंत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, कार्यकारी अभियंता श्री नारायण सरदार, शासकीय कंत्राटदार श्री लीलाधर भरडकर ,जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष श्री विक्रांत मेश्राम, पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची आणि देशाच्या प्रगतीत अभियंत्यांच्या योगदानाची माहिती दिली.
यानिमित्त धानोरा येथील आदिवासी वसतिगृहात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वॉटर कुलर विथ प्युरिफायर आणि गिझर देण्यात आला, तसेच नवेगाव येथील मूकबधिर विद्यालय येथे टीव्ही ही भेटवस्तू देऊन फळ वाटप करण्यात आली व मातोश्री वृद्धाश्रम येथे सहा महिन्याचे धान्य व किराणा साहित्य पुरवठा करून हा उपक्रम 'अभियंत्यांचे समाजाप्रती असलेले कर्तव्य' या संकल्पनेवर आधारित होता.


कार्यक्रमाच्या शेवटी, संघटनेच्या अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, "अभियंता केवळ इमारती आणि पूल बांधत नाही, तर तो देशाच्या विकासाचा पाया रचतो. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करणे हे प्रत्येक अभियंत्याचे कर्तव्य आहे." या कार्यक्रमामुळे अभियंत्यांमध्ये एकोपा वाढण्यास मदत झाली, तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments